पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 9 जुलैऐवजी 16 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. तब्बल 8 हजार 147 हरकतींवर कामकाज करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 7 दिवसांची मुदतवाढ महापालिकेस दिली आहे.
महापालिकेने 23 जूनला प्रसिद्ध केलेल्या 1 ते 46 प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर विक्रमी संख्येने हरकत प्राप्त झाल्या आहेत. मतदारांची नावे मोठ्या संख्येने आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट झाली आहे. त्यावरून माजी नगरसेवक व पदाधिकारी रोष व्यक्त करीत आहेत. हरकतीसंदर्भातील कामकाज करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची विनंती महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे 16 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.