रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
श्री साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलासभाऊ मडिगेरी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अंध मुलांना अन्नधान्य वाटप इ. उपक्रम राबविण्यात आले. विलासभाऊ मडिगेरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. या निमित्ताने इंद्रायणीनगर येथील वैष्णवी देवी मंदिराजवळ आय़ोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात १८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटीलद्वारा संचलित ब्लडबँक व वाय. सी. एम. हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने उद्योजक चंद्रकांत देशमुख व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेमध्ये विदयार्थ्याना अन्नधान्य वाटप करण्यता आले. ५० किलो रवा व ५० किलो पोहे, तसेच ५ हजार रुपये मदतनिधी देण्यात आला. यशवंतराव चव्हाण आश्रम शाळेत ७५ किलो पोहे व ७५ किलो रवा, चिंचवडच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला ५० किलो रवा व ५० किलो पोहे य़ाशिवाय १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. इंद्रायणीनगरमधील पिं चीं म न पा वैष्णोमाता प्राथमिक शाळेतील ६०० मुलांना खाऊ व बिस्कीट वाटप करण्यात आले. १० वी व १२ वीच्या ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कऱण्यात आला. जवळजवळ २१५ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग/श्याक व पॉवर बँक आणि ट्रॉफी बक्षिस देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधु शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार महेशदादा लांडगे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधु कार्तिक लांडगे. सचिन लांडगे, भाजपा प्रदेश सचिव अमीत गोरखे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर केशव घोळवे, प्रदेश कोशाध्यक्ष शैला मोळक, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, नवीन लैगुडे, माऊली जगताप, रामदास कस्पटे नाना राऊत, चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार उमा खापरे व शंकरशेठ जगताप यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भविष्यामध्ये अशीच प्रगती करुन देशसेवा व समाजसेवा घडावी, असे मार्गदर्शन केले. श्री. साई चौक मित्र मंडळ, विलासभाऊ यांचे सर्व मित्रमंडळी यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार धनंजय जाधव यांनी मानले.