पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर रचना विभागाचा लाचखोर सर्व्हेअर संदीप फकिरा लबडे याला अखेर, निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
वाकड विभागासाठी नियुक्त असलेला सर्व्हेअर संदीप लबडे याने तक्रारदार बांधकाम व्यावसायिकांकडून 3 लाख रूपयांची लाच मागितली होती. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 ऑगस्टला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुणे न्यायालयाने त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली.
फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने आयुक्त पाटील यांनी लबडे याला अटक झाल्याच्या दिवसापासून महापालिका सेवेतून निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश प्रशासन विभागास दिले आहेत.