पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड शहरामध्ये हर घर तिरंगा मोहिम राबवण्यात येणार आहे. यासाठी पुरवण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्या आहेत. हे ४० हजार झेंडे पुन्हा पाठवले आहेत.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निविदा प्रक्रिया राबवून झेंडे पुरवण्यासाठी पुरवठादार नेमले आहेत.
मोठ्या प्रमाणावर देशामधून झेंड्यांची मागणी असल्याने कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या झेंड्यांमध्ये रिजेक्शन पिसचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पिंपरी चिंचवड महापालिकेलाही चुकीच्या झेंड्यांचा पुरवठा होत आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८०० झेंडे आले आहेत. त्यापैकी ४० हजार झेंड्यांमध्ये आकाराचा फरक आढळला आहे. तसेच काही झेंडे वेडेवाकडे कापले असल्याचे आढळले आहे. हे झेंडे परत पाठवले आहेत.