पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व कार्यालयान ’जन गण मन हे राष्ट्रगीत वाजविले जात आहे. त्याची सुरूवात सोमवार (दि.22) पासून करण्यात आली आहे.
महापालिका भवन, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय, कर संकलन विभाग, गोदाम, पाणीपुरवठा विभाग आदीसह सर्वच कार्यालयात सकाळी दहाला राष्ट्रगीत वाजविण्याचा निर्णय तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलजबावणी 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. त्यानुसार पालिकेच्या सर्व कार्यालयात सकाळी दहाला राष्ट्रगीत वाजत आहे. त्याला अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.