मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अनेक राजकीय नेते यावर आपल्या भूमिका मांडताने दिसतात. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येणारी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फारच जिव्हारी लागलेली दिसते. कारण काल (२२ ऑगस्ट) धनंजय मुंडे यांना सुनावल्यावर आज (२३ ऑगस्ट) शेतकऱ्यांच्या मदतीवरील उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणालेत, तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत; परंतु मी कोणाच्या उगाच मागे लागणार नाही. किती सहन करायचे यालाही मर्यादा असतात. माझा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे. तसेच हा इशारा नाही, असेदेखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.