मुंबई |निर्भीडसत्ता न्यूज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाते वाटपानंतर सगळ्या मंत्र्यांचं लक्ष लागलं होतं ते बंगल्याच्या वाटपाकडे. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर नवनियुक्त मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले हवेत, यासाठीच्या सूचना मागवल्या होत्या.
कुणाला कुठला बंगला?
चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
रविंद्र चव्हाण-रायगड
अतुल सावे-शिवगड
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
गुलाबराव पाटील-जेतवन
शंभुराद देसाई-पावनड
संजय राठोड-शिवनेरी
सुधीर मुनगंटीवार-पर्णकुटी
विखे पाटील-रॉयलस्टोन
दीपक केसरकर-रामटेक
विजयकुमार गावित- चित्रकुट
राहुल नार्वेकर- शिवगिरी
सुरेश खाडे-ज्ञानेश्वरी
उदय सामंत- मुक्तागिरी
अब्दुल सत्तार-पन्हाळगड