पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिली. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय-65) यांचे शनिवार 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले होते.
आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळा भेगडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, शंकर जगताप या वेळी उपस्थित होते.