पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
आम आदमी पार्टीच्या वतीने 4 शाखा आणि संतोष इंगळे यांच्या संत तुकाराम नगर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड प्रभारी मा हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती उपस्थित होते.प्रभारी हरिभाऊ राठोड यांच्या नियोजित पिंपरी चिंचवड दौऱ्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष ब्रम्हानंद जाधव यांनी सांगितले. यावेळी आपच्या लता भोसले, सोनाली झोळ, अभिजित सूर्यवंशी, शुभम यादव, अशोक तनपुरे यांच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संत तुकाराम नगर येथे आपच्या पिंपरी विधानसभा प्रचारप्रमुख संतोष इंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.