पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहर शालेय आट्यापाट्या स्पर्धेत महापालिकेच्या डुडुळगाव शाळा संघाने चिंचवडच्या फत्तेचंद जैन विद्यालय संघाचा 34-30 असा गुण फरकाने पराभव करीत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद प्राप्त केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष सत्यवान वाघमोडे, सचिव रामेश्वर हराळे, रायगुंज माशाळे सचिन नाडे, सचिन खोत, पर्यवेक्षक आत्माराम महाकाळ आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने स्पर्धा शाहूनगर येथील राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण येथे झाली. चौथा वर्षे मुलांच्या अंतिम लढतीत डुडूळगाव शाळा संघाने सुरेख खेळ केला. तिसर्या क्रमाकांच्या लढतीत देहूरोडच्या आचार्य आनंद ऋषीजी महाराज विद्यालयाने काळेवाडीच्या एमएम विद्यालय संघाचे 10-7 ने पराभव केला.
मुलांच्या 17 वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात रावेतच्या एस. बी. पाटील स्कूलने फत्तेचंद जैन स्कूलचा 26-23 असा पराभव करीत विजेतेप प्राप्त केले. देहूरोडच्या आनंद ऋषीजी महाराज विद्यालयाने तिसर क्रमांक मिळविला. मुलांच्या 19 वर्षांखालील गटात चिंचवडच्या फत्तेचंद कनिष्ठ महाविद्यालय संघाने देहूरोडच्या आनंद ऋषीजी महाराज विद्यालयाचा अटीतटीच्या अंतिम लढतीत 27-25 असा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले.