पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील शाळांचा विकास केला जाणार आहे. तसेच त्याठिकाणी राबवण्यात येणारे उपक्रम येथे राबवले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांची कोअर टीम केली आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काम केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा नुकताच दिल्ली दौरा झाला. तेथील शिक्षण पद्धती, वर्गखोल्यांची रचना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य सामुग्री याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक गेले होते. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले, “ दिल्लीमध्ये शाळांचा परिसर मोठा आहे. जागा मोठी असल्याने अनेक उपक्रम राबवणे त्यांना सहज शक्य आहे. दिल्लीमध्ये शिक्षकांचे विविध समूह केले आहेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या समूहाच्यामाध्यमातून मार्ग काढला जातो. त्याचपद्धतीने आपल्या येथे कोअर टीम करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक विभागाचे ११ शिक्षक व माध्यमिक विभागाचे काही शिक्षक आहेत. हे शिक्षक आपल्या येथे येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करत आहेत. तसेच यासाठी त्यांना पाच-पाच शाळा विभागून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षक काम करणार असल्याचे जांभळे यांनी सांगितले.
ले.