पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव हिरामणराव लांडगे यांचे निधन झाले आहे. ते भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे चुलते होते. सुदामराव लांडगे हे भाजपचे युवा नेते शिवराज लांडगे यांचे वडील होत. भोसरीतील स्मशानभूमीमध्ये लांडगे यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लांडगे कुटुंबीयांचा आणखी एक मार्गदर्शक हरपला अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.