पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शिरगाव, मावळ येथील बी. के. बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन येथे आयपीएससी प्रिन्सिपल्स कॉन्फरन्स उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत देशभरातील इंडियन पब्लिक स्कूलचे प्राचार्य व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंग देओल आणि कल्याण येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक नरेश चंद्रा उपस्थित होते.
यजनाम शाळेचे प्राचार्य डॉ. राजीवकुमार चौहा यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षण सचिव रणजितसिंग देओल यांनी शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि संधींबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. सपना अग्रवाल यांनी 5+3+3+4 शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती दिली. शैक्षणिक साधन व मूल्य, संवाद आणि संज्ञानात्मक विकासामध्ये त्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक डॉ. अंजू चझोत यांनी शिक्षण व आरोग्य आणि शिक्षकाचे अध्यापन या विषयातील अभ्यासक्रम विकास व धोरणाबाबत मार्गदर्शन केले. विनीत केकेएन यांनी ’द जयहिंद प्रकल्पाचे सादरीकरण केले.
पाककला शिक्षणतज्ज्ञ अतुल गोखले यांनी शिकवण्याच्या पद्धती व मूलभूत जीवन कौशल्य यांच्यातील संबंधावर भर दिला. कार्यशाळेच्या अखेरीस झालेल्या सर्वसाधारण सभेत नैनिताल येथील बिर्ला विद्यामंदिराचे प्राचार्य अनिल शर्मा यांची अध्यक्षपदी आणि गोथन येथील एल. के. सिंघानिया एज्युकेशन सेंटरचे प्रचार्य आर. सी. शर्मा यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.