- भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची राष्ट्रवादीवर घणाघाती टिका
चिंचवड महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणाऱ्या प्रमोद साठे याच्याबाबत धक्कादायक माहितीसमोर आली आहे. साठे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. तसेच तो खुनातील आरोपी असून, एका अंडरवर्ल्ड डॉन टोळीतील गुंड असल्याचे स्पष्टझाले आहे. राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या एका माजी सभापतीने व एका विद्यमान नगरसेवकाने साठे याच्याशी संगनमत करून त्याला पंतप्रधान कार्यालयाकडे खोटी तक्रार देण्यासभाग पाडले. राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांच्या पुण्यातील कुटुंबासोबत साठेचे ऊठबस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड झाले असून, सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादी पैसे कमविण्यासाठी आता कोणत्या थराला चालली आहे, हे यातून उघड होत असल्याची घणाघाती टिका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगतापयांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. ४) केली.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “महापालिकेतील ठेकेदारांना आतापर्यंत नियमबाह्यपणे बिले दिली जात होती. मात्र भाजपने सत्तेत आल्यानंतर यापुढे कायद्यातीलतरतुदीनुसारचबिले देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याबाबत ठेकेदारांना कोणतीही अडचण नाही. मात्र ठेकेदारांच्या आडून नियमबाह्यपणे पैसे कमविण्याचा धंदाचालविलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजप नियमाने वागत आहे, हे रूचलेले नाही. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामांचे पैसे महापालिकेत अडकल्यामुळेठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिले मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
प्रमोद पुरूषोत्तम साठे याने ठेकेदारांची बिले देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रार सुद्धा राष्ट्रवादीच्या दबावाचाच एक भाग आहे. प्रमोद साठे ना महापालिकेचा ठेकेदार आहे ना शहरातील रहिवासी आहे ना त्याने कोणतेही पुरावे सादर केले आहेत. तरीही त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयानेचौकशीचे आदेश दिले. भाजपचा हा पारदर्शक कारभार आहे. प्रमोद साठे हा पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातील आरोपी असून, तोअंडरवर्ल्डमधील एका डॉनच्या टोळीतील गुंड आहे. त्याचप्रमाणे त्याला विश्रामबागवाडा पोलिसांनी बिल्डरांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अनेकवेळा अटकही केली आहे. तो सराईतगुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई देखील झाली आहे.
कोथरूडमधील मयुर कॉलनीतील हॉटेल ओएस्टरशी तो संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी महापौरांचे पुण्यात असलेल्या दुसऱ्या कुटुंबियांसोबत त्याची ऊठबस आहे. तसेचखुनाच्या गुन्ह्यात येरवडा जेलची हवा खाऊन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी स्थायी समिती सभापतीचा जवळचा मित्र आहे. या माजी स्थायी समिती सभापतीला आपल्याप्रभागात मॉडेल वॉर्डच्या नावाखाली केलेल्या कामांची बिले नियमबाह्यपणे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून अस्वस्थ झालेल्यास्थायी समितीच्या या माजी सभापतीने आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमाने नगरसेवकाने प्रमोद साठे याला पुढे करून पंतप्रधान कार्यालयाकडे खोटी तक्रार करण्यास भाग पाडले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंडरवर्ल्डचे संबंध उघड झाले आहेत. महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मनमानेल त्या पद्धतीने कामे करून करदात्यांच्या पैशांची लूटकरत होते. मात्र आता त्याला चाप बसल्यामुळे अंडरवर्ल्डमधील संबंधाचा वापर करून महापालिकेत नियमबाह्यपणे कामे करण्यासाठी एकप्रकारे धमकावले जात आहे. त्यामुळे सत्तेविनापिसाळलेली राष्ट्रवादी करदात्यांची लूट करून पैसे कमविण्यासाठी कोणत्या थराला चालली आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र भारतीय जनता पक्ष अशा दबावाला आणि खोट्या तक्रारींनाकदापीही भीक घालणार नाही. महापालिकेत नियमानेच काम चालेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.”