निर्भीडसत्ता न्यूज –
निगडीतील महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात विविध समस्या असुन त्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी पुढाकार घेत रुग्णालय व परिसराची पाहणी करत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून समस्याचा आढावा घेत सुधारणा करण्याच्या कामाला सुरुवात केली.
सेक्टर २२ निगडी येथे पालिकेचे यमुनानगर रुग्णालय असुन यात महिला प्रसुति गृह, क्षयरोग निदान केंद्र तसेच प्राथमिक आजारावर उपचार केले जातात परंतु भाजपची मागणी आहे की, येथे अतिदक्षता विभाग व २४ तास तातडिक सेवा सुरु करून आरोग्याचा उत्तम दर्जा येथील नागरिकांसाठी उपलब्ध करावा अशी आहे पण रेडझोनमुळे सध्या अडचन आहे त्यासाठीही भाजप नगरसेवक पाठपुरावा करत आहेत अशी माहिती नगरसेवक केंदळे यांनी दिली.
भाजप नेते बापु घोलप, प्रभाग अध्यक्ष भरत थोरात, उमेश घोडेकर, कौस्तुभ देशपांडे, रूपल माने, रवि पाटोळे, संकेत चित्ते, प्रशांत तरटे, गणेश साठे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याबाबत भाजप नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी यमुनानगर रुग्णालयाची पाहणी केली यावेळी रुग्णालयातील आतिल समस्याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रॉय यांच्यासोबत चर्चा करून विविध सुधारणा करण्याची मागणी केंदळे व घोलप यांनी केली तसेच येथील रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गवत व अनावश्यक झाडे झुडपे वाढलेली आहेत तसेच मागच्या बाजुला ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे येथील झाडाझुडपात हे दुर्गंधीयुक्त पाणी साचुन डास व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, उद्यान विभागाच्या वतीने येथील गार्डन व शोभेच्या रोपाची झाटनी करण्याची गरज आहे तसेच रात्री रुग्णालयात व मुख्यप्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्याची व बाहेरिल खांब्यावरील बंद असलेल्या लाईट सुरु करण्याची मागणी ही येथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.भावसार यांनी नगरसेवकांकडे केली, याचीच दखल घेत येथील समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना बोलवुन तात्काळ येथील समस्या मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते याचीच दखल घेत सुधारणा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यामुळे रुग्णालय कर्मचारी व नागरिकांनी केंदळे व घोलप यांचे आभार मानले.