निर्भीडसत्ता न्यूज –
नवी दिल्ली: शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी खोटं किंवा बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचं आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर अशी व्यक्ती शिक्षेसही पात्र असतील, असंही कोर्टाने ठणकावलं.
बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करुन नोकरी आणि पदवी मिळवणाऱ्यांना या निर्णयामुळे आळा बसणार आहे. बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारा व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्त्वाचे ठरणार नाही. एखादी व्यक्ती २० वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असला तरी त्याची नोकरी जाणार आहे. त्याला शिक्षाही होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बरीच वर्ष नोकरीवर असले तरी अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल. त्यांच्याविरोधात नरमाईची भूमिका घेता येणार नाही, असे सुप्रीम न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल, अशी घोषणा केली होती.
[/highlight]