निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी – रहाटनीतील प्रभाग क्रमांक २७ मधे परिसरातील विविध ठिकाणी माहिती व मार्गदर्शन मेळाव्यात् तीस महिला बचत गटांनी सहभाग घेतला. नगरसेवक बाबा त्रिभुवन यांच्या वतीने महिला बचत गटांसाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक बाबा त्रिभुवण, महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले या वेळी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी या वेळी महिला बचत गटांना दिली.
या वेळी बचत गटांच्या महिलांनी विचारणा केलेल्या विविध कल्याणकारी योजनां संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे ऐवले यांनी दिली.
नगरसेवक बाबा त्रिभुवन यांनी उपस्थित महिला बचत गटातील महिलांना महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या मेळाव्यासाठी तीस महिला बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदविला.