आयुक्त हर्डीकर यांच्याकडून दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी: प्रतिनिधी
बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविल्याप्रकरणी नगररचना विभागातील सर्व्हेअर सुभाष विठ्ठल खरात यांचे सेवानिलंबन करण्यात आले आहे. सुभाष खरात आणि चंद्रशेखर नार्वेकर या दोघांनी कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
सुभाष खरात महापालिकेच्या नगररचना विभागात सर्व्हेअर म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविण्यामध्ये प्रमुख सहभाग असल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. याच गुन्ह्यात खरात यांना अटक होवून न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सध्या या गुन्ह्याचा तपास सुरु असून पिंपरी पोलिसांनी ५ जूलैपर्यंत महापालिका अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.
खरात यांनी गैरवर्तन करून महापालिकेती प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांना अटक केल्याच्या दिनांकापासून सेवानिलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चंद्रशेखर नार्वेकर या कर्मचा-याचीही खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत