निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी: प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गाचे भोसरीपासून मोशीपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणाला मोशीतील रस्ता बाधितांनी विरोध केला आहे. त्यांनी या रस्त्यांची रुंदी कमी करण्याची मागणी महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली आहे.
महापालिका नगररचना विभागाने या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भूमिसंपादनाची कार्यवाही सुरू केली आहे. भूमिसंपदनासाठी या रस्त्याचे दोन टप्पे असून नागरिकांना जागेचा ताबा देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणा-या जागामालकांनी सोमवारी (दि. १७) महापौर नितीन काळजे यांची भेट घेतली. रस्ता बाधितांनी या रुंदीकरणाला विरोध केला आहे. स्पाईन चौकापासून मोशीतील इंद्रायणी नदीपर्यंतचा रस्ता ६० मीटर रुंद आहे. त्याची रुंदी ६० मीटवरून कमी करावी, अशी मागणी मोशीतील जागा मालकांनी केली आहे