निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळेनिलख येथील विशाल लायगुडे यांची भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी विशाल लायगुडे यांना मुंबईत निवडीचे पत्र दिले.
कामगार वर्गाच्या अनेक मागण्या सहविचाराने सोडवावेत. तसेच कामगार वर्ग व मालक वर्ग यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.