निर्भीडसत्ता न्यूज –
चिखली येथिल पूर्णांनगर येथे एका ३८ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा प्रकाश पाटील आहे. दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना पूजा ने टोकाचे पाऊल उचलले. दुपारी एकच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीतील पूर्णानगरमध्ये विवाहित महिलेने आत्महत्या केली. पूजा प्रकाश पाटील (वय ३८) असे या महिलेचे नाव आहे. प्रकाश आणि पूजा यांना दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुले शाळेत गेल्यानंतर पूजाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दोन्ही मुले दुपारी एकच्या सुमारास घरी आली. बराचवेळ दरवाजा वाजवून देखील पूजाने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या शिक्षिकेने पूजा यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईलवर प्रतिसादन मिळाल्याने अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
सविस्तर वृत्त असे की,
पूजाचे पती प्रकाश पाटील हे दिल्ली येथे कामानिमित्त गेले आहेत. ते नेहमीच अशा प्रकारे बाहेर गावी असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्तेच कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.