निर्भीडसत्ता न्यूज
स्थायी समितीने दिला होता बाहेर जाण्याचा आदेश
पिंपरी- महापालिका शाळांना भेटी न दिल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांना बुधवारी (दि. १९) स्थायी समितीने बैठकीतूनच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. स्थायीच्या आदेशानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मध्यस्ती केल्याने त्यांचे बाहेर जाणे टळले.
शाळांची दुरावस्था व बाकांचा अभाव असल्याने स्थायी समितीने मागील बैठकीत अतिरिक्त आयुक्त हांगे यांच्यावर रोष व्यक्त केला होता. त्यांना शाळांना भेट देवून सविस्तर अहवाल स्थायी समितीला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मोजक्याच शाळांना भेट दिली, तसेच समस्या असलेल्या शाळा शोधल्याच नसल्याचे समोर आले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांनी पुन्हा हांगे यांच्यावर रोष व्यक्त केला.
संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे सांगत सावळे यांनी अतिरिक्त आयुक्तांना बैठकीतून बाहेर जाण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आयुक्त हर्डीकर यांनी तातडीने मध्यस्ती केली. त्यांनी लक्ष घालून शाळांचे प्रश्न सोडविण्याविषयी स्थायी समितीला अस्वस्थ केले. हांगे यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचे बैठकीच्या बाहेर जाणे टळले.