निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेने प्रभाग कार्यालये सहावरून आठ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवीन प्रभाग कार्यालयांचा येत्या ९ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे. नवीन दोन प्रभाग कार्यालयांचे उद्घाटन करून सर्व प्रभाग कार्यालयांचे कामकाज त्या दिवशी सुरू होणार आहे, अशी माहिती भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने प्रभाग कार्यालये वाढविण्याचा निर्णय घेतला. शहरात दोन प्रभाग कार्यालये वाढविण्यात आल्याने त्यांची संख्या आठवर गेली. प्रभाग कार्यालये कार्यन्वित करण्यामुले चार महिने प्रभागांचे काम रखडले होते. प्रशासनाकडून दोन प्रभागांसाठी कार्यालये, फर्निचर साहित्य आणि कर्मचारी वर्गाची जुळवाजुळव सुरू होती. हे काम जवळपास पूर्ण झाले असून प्रभाग कार्यालये कार्यन्वित होत आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे निमित्त साधून कार्यालयांचे उद्घाटन केले जाणार आहे. तत्पूर्वी प्रभाग समित्या कार्यन्वित होणार असून प्रभागाचे अध्यक्षही निवडले जातील.
अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह हे आठ कार्यालये त्या दिवशीपासून सुरू होनार असल्याचे एकनाथ पवार म्हणाले आहेत.