निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी गावातील महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरी झाली. मदिरातील महालक्ष्मीच्या मूर्तीवरील दोन तोळ्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
डल्ला मारणाऱ्या चोरट्याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्याने येताना स्वत:ला पूर्णपणे झाकुन घेतले होते. मात्र, चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरट्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.