मुलामुलींना जाणवणारी सर्वांत मोठी समस्या म्हणजे ’ब्लॅक हेडस’ जेव्हा आपल्या शरीरातील तेल ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात तेल उत्पादन करतात, तेव्हा त्वचेवरील छिद्र बंद होतात. त्यामुळे चेहर्यावर ब्लॅक हेडस् निर्माण होत असतात. ब्लॅक हेडस् हे चेहर्यावर, गालावर व माथ्यावर, नाकावर, येत असतात. चेहर्यावर तेलाची निर्मिती करणार्या ग्रंथी अधीक असल्याने ब्लॅक हेडस् व मुरुम येण्याचे प्रमाण जरा जास्त असते. ज्यांची त्वचा ही ऑईली असते, त्यांना ब्लॅक हेडस्ची समस्या मोठ्या प्रमाणात असते.
फेशवॉश आणि फेसजेल यांचा वापर करून ब्लॅक हेडस्च्या समस्या सोडविल्या जातात. त्यांच्या वापराने चेहर्यावरील तेलाचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे नवीन ब्लॅक हेडस् तयार होण्याची प्रक्रिया खुंटते. सोबतच जुने ब्लॅक हेडस्ही नाहिसे होण्यास मदत होते. सगळ्यात महत्वाचे चेहर्यावरील तेज कायम ठेवण्यासाठी कमीत कमी मेकअप केला पाहिजे. खालील काही गोष्टीं तुम्हाला ब्लॅक हेटस्पासून सुटका मिळविण्यासाठी मदत करतील.
१. आठवड्यातून किमान एकदा तरी नारळाचे पाणी चेहर्यावर लावले पाहिजे. त्वचा कोरडी पडत नाही.
२. मुलतानी माती आणि गुलाब जल यांचा लेप चेहर्यावर लावल्यान त्वचा मुलायम राहते. सोबत ब्लॅक हेड्सही येत नाही.
३. पाण्यात भिजलेल्या मुलतानी मातीत थोडीशी जवची कणीक आणि हळद पुड टाकून तयार झालेले मिश्रण आंघोळीपूर्वी चेहर्यावर लावल्याने ब्लॅक हेड्स कमी होतात व चेहराही खुलतो.
४. दही किंवा ताकात ओव्याची पुड टाकून त्याचा लेप चेहर्यावर लावू काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
५. नारळाच्या तेलामध्ये अद्रकाचा रस मिसळून चेहर्यावर लावावा.
६. लीबूंचा रस, तुळशीच्या पानांचा रस, गुलाब जल व ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून एका काचाच्या पात्रात एकत्र करावे. हा लेप चेहर्यावर लावल्यास ब्लॅक हेड्सची समस्या दूर होते.
७. कडूलिंबाची निंबोळीचा लगदा चेहर्यावर लावल्याने ब्लॅक हेड्स कमी होतात.
८. जांभुळ, बोर व आंब्याची कोय बारीक करून बेसनामध्ये मिळळावी. हा लेप चेहर्यावर लावल्यावर फायदा होतो.
९.हळद, दही व बेसन एकत्र करून तयार झालेला लेप चेहर्यावर लावावा. एक तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.