निर्भीडसत्ता न्यूज –
मुंबईला जुन्या पाचशे व हजराच्या नोटा बदलण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघा जणांना 2 कोटी 90 लाखांच्याजुन्या नोटांसह पकडण्यात आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दि. 28) रात्री उर्से गावाजवळ केली आहे.
गौरव अगरवाल (रा. पिंपरी), निविंदू गोयल (रा. पिंपळेगुरव) आणि दिलीप गुप्ता या तिघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे जण जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुंबईला गेले होते. मुंबईत नोटा बदलता न आल्यामुळे नोटा घेऊन पुन्हा पुण्याकडे जात होते. दरम्यान, त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी मिळाल्याने त्यांनी पाठलाग करून पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावल उर्से टोल नाक्याजवळ या तिघांना पकडले. त्यांच्या गाडीतून 2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुन्या नोटा पालिसांना सापडल्या आहेत.
ग्रामीण पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.