निर्भीडसत्ता न्यूज –
मराठी शाळांची रोडावत जाणारी विद्यार्थीसंख्या आणि बंद पडू लागलेल्या तुकड्या हा चिंतेचा विषय आहे. त्याच अनुषंगाने भाजपने शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेत विविध उपक्रमांव्दारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच भेट देऊन शाळेतील शिक्षकांची बैठक घेत या उपक्रमाबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी माहिती दिली. कामठे यांनी शुक्रवारी(दि 28)पिंपळे निलख येथिल महापालिकेची शाळा दत्तक घेतली.
नगरसेवक तुषार कामठे म्हणाले की, महापालिका शाळेतली मुलंही मोठी होऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकतील,याची खात्री मुलांच्या पालकांना व्हावी म्हणून पिंपरी चिंचवड मधे भाजपने पुढाकार घेतला आहे. या मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे ही कामठे यांनी सांगितले.
अश्या उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल असा विश्वास शाळेच्या शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.