निर्भीडसत्ता न्यूज –
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, अनुराधा गोरखे, चंदा लोखंडे, अश्विनी बोबडे, नगरसेवक उत्तम केंदळे, बाळासाहेब ओव्हाळ, तुषार हिंगे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात यमुनानगर, टी. बी. युनिट यांनी आयोजित केलेल्या क्षयरोग पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटनही महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते झाले. या पोस्टर्स प्रदर्शनाचे नियोजन टी. बी. सुपरवायजर चंद्रशेखर सरोदे, प्रल्हाद जाधव, विकाल क्षिरसागर यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका झुंबर शिंदे, गणेश क्षिरसागर, नोव्हेल संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, भगवान शिंदे, सुनिल भिसे, सुभाष चव्हाण, सुरेश जोगदंड, बबन मोरे, धनंजय भिसे, नितीन घोलप, यादव खिलारे, मिनाताई खिलारे, बाळासाहेब खंदारे, मनोज तोरडमल, शिवाजी साळवे, संजय ससाणे, किशोर हातागळे, आशा शहाणे, भानुदास साळवे, सतिश भवाळ, वसंत वावरे, विशाल कसबे, ए. पी. रामटेके, विद्या जाधव, कलावती पासोटे, डी. पी. खंडाळे, रामकिसन वैरागे, तुकाराम उदगिरे, सुर्यकांत गायकवाड, मोहन वाघमारे, नामदेव रिटे, गणेश साठे, रवि पाटोळे, विकास गालफाडे, सुरेश शहाणे, भिमा वाघमारे, साहेबराव साळवे, सागर गायकवाड, भगवान खुडे, मारुती दाखले, युवराज दाखले, मोहन भिसे आदी उपस्थित होते.