निर्भीडसत्ता न्यूज –
शाळा, महाविद्यालयासोर मुलींची छेड काढणा-या रोडरोमियोंना आवरा, असे आवाहन महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने मंगळवारी (दि. १)पोलिसांना केले आहे. समितीच्या सभापती सुनिता तापकीर यांनी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना राखी बांधून महिला, मुलींच्या रक्षणासाठी पाठीराखा बनण्याचे आवाहन केले.
सुनिता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीला पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना बोलाविण्यात आले होते. बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह नगरसेवक सागर आंगोळकर, आशा शेंडगे-धायगुडे, वैशाली घोडेकर, योगीता नागरगोजे, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकीता कदम, रेखा दर्शिले, नगरसचिव उल्हास जगताप, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते.
महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर म्हणाल्या, बडी कॅप, पोलीस काका या योजनेचे जनजागृती महापालिका व पोलीस यंत्रणे मार्फत पोस्टर, सिटी केबल, वर्तमान पत्रे, प्रसार माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. पोलीसांमार्फत लेडी पोलीस मार्शल शाळा, महाविद्यलये, कार्यालये आदी ठिकाणी नेमण्यात यावे. विविध सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या.