निर्भीडसत्ता न्यूज –
एमआयडीसी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी पकडले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि. १) पहाटे चारच्या सुमारास अटक केली.
अमोल अशोक गायकवाड (वय – 20), नितीन शरद पवार (वय 25), अतिष ऊर्फ पप्पू कोंडीराम काळे (वय 24), विनोद प्रकाश बाबर (वय 21, सगळे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या जार जणांची नावे आहेत. दाद्या ऊर्फ कृष्णा गणेश भोसले हा पसार झाला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पहाटे उषा एंटरप्रायजेस या कंपनीजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळी येणार असल्याचे बातमीदारामार्फत समजले. पोलिसांनी तेथे सापळा रचून या चार जणांना जेरबंद केले, परंतु दाद्या हा तेथून पोलिसांच्या तावडीतून निसटला. कोयता, चाकू, मिरचीची पूड यासारखे घातक साहित्य पोलिसांना या चौघांकडे मिळून आले. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.