पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखालील सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी गुरुवारी (दि. 3) दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शहरातील रेडझोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तळवडे, रुपीनगर, चिखली हा पट्टा रेडझोनच्या हद्दीत येतो. बोपखेल आणि पिंपळे-सौदागर येथील रक्षक चौकातील रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षणासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर त्यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले. त्यामुळे संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त केली जात होती.
प्रलंबित प्रश्नांसाठी भाजप शिष्टमंडळाने घेतली नितीन गडकरींची भेट
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना प्रश्नांची माहिती देण्यात आली. तसेच, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्यासमवेत याबाबत बैठक होणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ़ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांना भेटून संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती दिली. संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यालाही माहिती देण्यात आली आहे. शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी नितीन गडकरी सकारात्मक आहेत. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असून या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.