निर्भीडसत्ता न्यूज –
आई वडील मुलाला उत्तम शाळा, उत्तम शिक्षण, पौष्टिक आहार, उत्तम कपडे, खरं तर प्रत्येक गोष्ट चांगली कशी मिळेल याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला जपताना सर्व सुखसोयींनी युक्त असे जगणे त्याला प्राप्त व्हावे म्हणून जिवाची धडपड मुलांचे पालक करत असल्याचे मत नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केले. पिंपळे निलख येथील महापालिकेच्या कै. भाऊसाहेब साठे शाळा क्र ५३ येथे पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नगरसेवक कामठे बोलत होते.
यावेळी सर्व पालकांनी त्यांना भेडसवणाऱ्या समस्या यांवर सुमारे २ तास नगरसेवक तुषार कामठे व शालेय व्यवस्थापनासोबत बरोबर चर्चा केली. पालकांच्या समस्या ऐकुन घेऊन त्यांवर पर्याय काढण्याची ग्वाही कामठे यांनी दिली.
या वेळी शाळेबद्दल असलेल्या समस्या व भविष्यामध्ये करावयाचे बदल या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक तुषार कामठे यांनी शालेय विध्यार्थ्यांशी संवाद साधला. पालकांबरोबरच विध्यार्थ्यांच्या देखील समस्या व सूचना समजून घेतल्या.
नगरसेवक कामठे यांनी शाळेतल्या मुलींना दुपारचे पोषण आहार दिले जातात. खिचड़ी भात खावुकन त्या भोजनाचा दर्जा तपासला.