बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकडे लगेच नवे भगदाड निर्माण करण्यात निसर्गाची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वाई-पाचगणी रस्त्यावर घाटात १६ नंबरजवळ मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाडाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे.