निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड विधानसभा मतदारसंघ संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर काळेवाडी तापकीरनगर येथील अश्विनी तापकीर, थेरगाव येथील चैत्राली शिंदे, नरेंद्र माने आणि पिंपळेगुरव येथील आदिती निकम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर उपस्थित होते.