निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या नव्याने कार्यन्वित होत असलेल्या आठ प्रभागांच्या अध्यक्षपदी भाजपचे सात व एक अपक्ष असे आठ नगरसेवक बिनिविरोध निवडले जाणार आहेत. भाजपने अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांनीही प्रभागअध्यक्षपदी संधी दिली आहे.
नवीन आठ प्रभाग समित्या व त्यांची कार्यालये येत्या ९ ऑगस्टपासून कार्यन्वित होणार आहेत. त्याच दिवशी प्रभाग अध्यक्षपदासठी निवडणूक होणार आहे. या आठ प्रभाग समित्यांसाठी शनिवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाजपकडून अ प्रभागासाठी केशव घोळवे, ब प्रभागासाठी सचिन चिंचवडे, क प्रभागासाठी आश्विनी जाधव, ड प्रभागासाठी शशिकांत कदम, इ प्रभागासाठी भिमाबाई फुगे, फ प्रभागासाठी साधना मळेकर, ग प्रभागासाठी अभिषेक बारणे, ह प्रभागासाठी अंबरनाथ कांबळे यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पाच अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत सहयोगी आहे. त्यामुळे फ प्रभाग समितीवर अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांना भाजपने संधी दिली आहे. प्रभाग समित्यांवर भाजपचेच वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीने इतर निवडणुकांप्रमाणेच प्रभाग समित्यांच्या निवडणुकीकडेही पाठ फिरविली आहे