निर्भीडसत्ता न्यूज –
मास्टर अविर जाधव वय 2.5 वर्ष याने 208 देशांची नावे 4.5 मिनिटात जगाच्या नकाशावर वाचून दाखवण्याचे रेकॉड केले आहे. मास्टर अविर आणि त्याच्या आई वडीलांचा सत्कार पिंपळे सौदागर येथे नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला.
पोपट जगताप, सोपानराव काटे, उत्तम धनवटे, संदीप काटे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मास्टर अविरची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी नोंद करणार आहे. या निमित्ताने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक नाना काटे यावेळी म्हणाले की, प्रत्येक मुलात विशिष्ठ क्षमता असतात. बुद्धिमत्ता म्हणजे स्मरणशक्ती, लेखन, वाचन, गणित उत्तम प्रकारे सोडवता येणं किंवा पटापट उत्तर देण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता तीच हया अडीच वर्षाच्या मास्टर अविर मधे दिसून येते.