पत्रकार संजय माने यांना यावर्षीचा ‘उध्दवश्री पुरस्कार 2017’ देऊन होणार गौरव
निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणा-या ‘उध्दवश्री पुरस्कार 2017’चा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार (दि. 9 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 5 वाजता चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते आणि जलसंपदामंत्री विजयबापू शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती उध्दवश्री पुरस्कार समितीचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष देवराम गावडे, कार्याध्यक्ष राहुल कलाटे, उपाध्यक्षा सुशिला पवार, संपत पवार, खजिनदार रमेश जाधव, कविता जिंदल, सचिव गुलाब गरुड, सहसचिव अमित धुमाळ, तेजस डेरे, राम पात्रे, शिवाजी कु-हाडकर, युवराज कोकाटे, बेबी सय्यद, सारिका तामचीकर आदी उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यास संपर्क प्रमुक डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते शशिकांतभाऊ सुतार, संपर्क प्रमुख बारामती सत्यवान उभे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग आप्पा बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, सिने अभिनेता प्रसाद ओक, संजय लोंढे, अभिनेत्री स्मिता गोंदकर, उद्योजक विजय शिर्के, राजू सांकला, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे (क्रीडा – क्रिकेट), विरेंद्र म्हैसकर (सार्वजनिक बांधकाम व्यावसायिक), धनराज पिल्ले (पद्मभूषण, हॉकी), भाग्यश्रीताई पाटील (शैक्षणिक), प्रकाश देवळे (माजी आमदार), डॉ. सतिश देसाई (सामाजिक), राजु भोसले (उद्योजक), अक्षय बाहेती (सनदी लेखापाल), शिवराज चापुले (उद्योजक), प्रमोद भावसार (वाहतूक व्यावसायिक), सुनिल अजवानी (सार्वजनिक बांधकाम व्यावसायिक), अनंत पाटील (प्रशासकीय), ॲड. सत्यनारायण चांडक (कायदा विषयक), कमलताई सोंजे (साहित्यिक), डॉ. बाळासाहेब पाटील (वैद्यकिय), संजय माने (पत्रकारिता) यांना यावर्षीचा ‘उध्दवश्री पुरस्कार 2017’ देऊन गौरविण्यात येणार आहे.