निर्भीडसत्ता न्यूज –
“मैत्री नात्याची, विश्वासाची, तुमच्या आणि माझ्या आपुलकीची… ”
अशीच एक मैत्री जपली आहे पिंपळे सौदागर येथिल लहान मुलांनी. या लहान मुलांनी नगरसेवक नाना काटे यांना मैत्रीचा धागा बांधून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक नाना काटे यांनी या बाळगोपाळाशी संवाद साधला.
या वेळी नगरसेवक नाना काटे म्हणाले कि, मैत्री म्हणजे एक रोपटं असतं जे जमिनीत पूर्णपणे रुजलेलं असतं वर दिसतं त्याच्या दुप्पट ते जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं. जसा पाण्याचा रंग कोणता याचं उत्तर देता येत नाही, तसंच मैत्रीचं आहे.
ती कशी असते, कधी कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचंच बंधन राहत नाही तसेच या बाळगोपाळाकड़े पाहुन हे मैत्रिचे नाते जपताना आनंद वाटत असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.