निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपा युवा मोर्चाच्या बेटी बचाओ, बेटी पाढाओ मोहिमेचे अध्यक्ष अमित गुप्ता यांना त्यांच्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हरियाणा राज्यातील कर्नाल येथे नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
अमित गुप्ता बेटी बचाओ, बेटी पाढाओ मोहिमेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात काम करत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ पेक्षा जास्त मोहिमा राबवल्या आहेत. शाळा, दवाखाने, रुग्णालये व सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम करून जनजागृती करण्याचे काम केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या कामासाठी गुप्ता यांच्यासह शिल्पी शुक्ला व संतोष शहा यांनाही महान राष्ट्रभक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शाहिद उधमसिंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष राष्ट्रसेवा कार्यासाठी दिला जातो.