निर्भीडसत्ता न्यूज –
मुंबईत उद्या बुधवारी(दि. ९) मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांना बंद राहतील. दरम्यान, मोर्चात मुंबईचे डबेवालेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्या सेवा बंद राहतील अशी माहितीही देण्यात आली आहे.
मुंबईतील भायखळा येथून सकाळी ११ वाजता मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदानात मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल, असा दावा आयोजकांनी केला आहे. मोर्चात होणारी गर्दी आणि उद्भवणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.
मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने मुंबई पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सुरक्षेसाठी ७ हजार पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. मोर्चेकऱ्यांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नजर ठेवण्यात येणार आहे. मोर्चात अहमदनगर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. आझाद मैदानावर मोर्चाची सांगता होईल.