निर्भीडसत्ता न्यूज –
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या सोमवारी कुडाळमधील शक्तीप्रदर्शनानंतर झालेल्या सभेत २१ तारखेला पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते भाजप प्रवेशाबाबत घोषणा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याऐवजी राणे स्वत:चा पक्ष स्थापन करतील, त्यासाठी भाजप त्यांना सहकार्य करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.