निर्भीडसत्ता न्यूज –
आपल्या मधील कलागुण अचूक ओळखूनच क्षेत्र निवडा आणी एकदा क्षेत्र निवडले की, मग मागे पुढे नपहाता त्यावर तुटून पडा, तसेच उत्तम प्रभावी वक्ता होण्यासाठी आपल्या नैसर्गीक शैलीचा वापर करा असे मत रोहिदास धूमाळ यांनी थेरगाव येथे व्यक्त केले.
थेरगाव येथील गुजर नगर मधील सामाजीक कार्यकर्ते हरीश मोरे यांनी उत्तम वक्ता म्हणून परिसरात परिचीत असलेलेदोन वर्षा पुर्वी ही कार्यशाळा सुरू केली , शहरात विविध क्षेत्रात काम करणार्या तरूण तरूणींना भाषण, वक्ता, सुत्रसंचलन क्षेत्रात करियर करण्यासाठी मार्गदर्षन व सराव करण्याच्या हेतूने एक हक्काचे व्यासपीठ म्हणून ही कार्यशाळा सुरू केली, मागील दोन वर्षात आज पर्यंत 60 पेक्षा जास्त विद्यार्थी या कार्यशाळेतून यशस्वी काम करत आहेत.
कार्यशाळेत विद्यार्थांना विविध विषया वरील पुस्तके, साहित्य, लेख, सिडी पुरवल्या जातात. या कार्यशाळेच्या माध्यमातून आठवड्यातून मार्गदर्षन करण्यासाठी विविध क्षेत्रातील वक्ते बोलावले जातात.
रोहिदास धुमाळ म्हणाले की, या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर भाषेवर प्रभुत्व मिळवून शब्द भंडार वाढ्वणे गरजेचे आहे तसेच आपले धेय्य एकदा पक्के केले की स्वता:वर विश्वास ठेवून त्यावर उत्तम सराव, योग्य नियोजन आणी आत्मविश्वासाच्या बळावर नक्कीच यश मिळेल तसेच उत्तम वक्ता तसेच सुत्रसंचालक होण्यासाठी आपल्या अंगभुत असनार्या नैसर्गीक शैलीचा वापर करा असे मत धुमाळ यांनी व्यक्त केले.
हरिश मोरे यांनी सूत्रसंचाल व अभार मानले.
![](http://nirbhidsatta.com/wp-content/uploads/2017/09/WhatsApp-Image-2017-09-25-at-10.22.53-PM.jpeg.jpg)