सैनिक टाकळी / प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे बीज रुजविण्यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस महाराष्ट्र शासनाच्यावतीने सैनिक टाकळी येथिल कुमार व कन्या विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे बीज रुजविण्यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो.
विद्यालयामध्ये लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिक टाकळी गावचे सुपुत्र आणि इयत्ता ५ वी च्या बालभारती मधील ‘कठिण समय येता’ या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांनी मुलांशी सुसंवाद साधला. वाचनाचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविले.
शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मळे मॅडम व कन्या शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब मेटकरी यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग या वेळी उपस्थित होते.
शाळांमध्ये मुलांना वाचनाचे महत्व व जगाच्या कल्याणासाठी अखंड झिजलेले संत,थोर महात्मे यांच्या विषयी माहिती देण्यात अली. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले, डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती देण्यात आली तसेच मुलांना वाचनाची प्रेरणा देण्यात आली. विविध विषयांची मुलामुलींनी वेगवेगळी पुस्तके हाताळली.