निर्भीडसत्ता न्यूज –
पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षांनी स्थानिक गटातटा बरोबर सोयीच्या आघाड्या स्थापण करीत निकाला नंतर स्थानिक पातळीवरील विजयी सरपंच आपलाच असा दावा करीत आपलीच सत्ता यावर नेत मंडळी ठाम राहिले आहेत मात्र भाजपाने प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीत दमदार एंट्री करीत समाधानकारक यश प्राप्त केले आहे तर कॉग्रेस,राष्ट्रवादी ,स्वाभिमानी पक्षाला काही जागा राखण्यात यश मिळविले आहे तर शिवसेनेला काही
औरवाड, कनवाड, हेरवाड, अकिवाट, टाकवडे, नवे दानवाड, शिवनाकवाडी येथे सत्तांतर झाले. चिंचवाड सरपंचसह ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. एकूण 15 सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळी पावणेअकरा वाजल्यापासून निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. ग्रामपंचायतीसह बिनविरोध झालेल्या चिंचवाडगावची सत्ता स्थानिक आघाडीवर कायम ठेवण्यात यश आले आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता मत मोजणीस प्रारंभ झाला एकूण 14 टेबलवर पाच फेरीमध्ये गाव निहाय सरपंच व प्रभागवार मोजनीस सुरुवात झाली पहिल्या फेरीत औरवाड ग्रामपंचायत तर अंतिम पाचव्या फेरीत हरोली ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर करण्यात आला निकालाची हुरहुर लागलेल्या कार्यकर्त्यासह समर्थक नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी सकाळ पासूनच गर्दी केली होती जसजसे निकाल जाहिर होतील तसतसे विजयी समर्थकांनी गुलालाची उथळण करीत जल्लोष केला.
विजयी सरपंच व त्यांना कंसात पडलेली मते अशी
औरवाड -अश्रफअली पटेल(1847),कनवाड – बाबासो
आरसगोंडा(1252) , खिद्रापूर – हैदरखान मोकाशी(704) , शिवनाकवाडी –
श्रीकांत खोत(1298) , टाकवडे – प्रकाश पाटील (2632), कवठेसार – दिपाली
भोकरे(1361) , हेरवाड – सुरगोंडा पाटील(1982) , राजापूरवाडी – विजय
एकसंबे(463), नवेदानवाड – वंदना कांबळे(971) , अकिवाट – विशाल
चौगुले(3172) , संभाजीपूर – अनुराधा कोळी (868), उमळवाड – रामचंद्र
कांबळे (1809), राजापूर – सविता पाटील(1276) , हरोली – गिता कांबळे
(686).