कुरुंदवाड / प्रतिनिधी – प्रा. संदिप सावगावे
निर्भीडसत्ता न्यूज –
कुरूंदवाड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने विविध उपक्रम गावामध्ये राबवण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी, हृदयरोग तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.
आमदार उल्हासदादा पाटील, श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, शिरोळ तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, जि. प. सदस्य बंडा माने, अशोकराव माने, अशोकराव कोळेकर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते यांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आदरणीय बापू यांना समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कुरुंदवाड नगरीचे नगराध्यक्ष म्हणून बापूंनी दिर्घकाळ काम केले आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून येण्याचा मान बापूंना मिळाला.
एकच ध्यास, एकच प्रयास आणि नेहमी जन सहवास असणारे शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे बापू , लहान मुलांच्या पासून अगदी मोठ्यांच्या पर्यंत एक आदराचं स्थान म्हणजे बापू, आपलं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वेचले आहे. म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी भेट दिली