निर्भीडसत्ता न्यूज –
पुरातन कालापासून पिकलेल्या पपईचा गर हा एक प्राकृतीक आणि उपयुक्त सौंदर्य-प्रसाधन म्हणून करतात. कारण यात अ, ब, क ही जीवनसत्वे भरपूर असतात. तसेच यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस कार्बोहैड्रेटस्चे प्रमाणही अधिक असते. याचा गर जर नियिमीतपणे चेहऱ्यावर चोळला तर त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यावरील डाग, पुरळ इ. कमी होतात. जर चेहरा व अन्य ठिकाणी मस असेल, तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळून लावावा.
नियिमितपणा केल्यास मस जाऊ शकतील. चेहऱ्याचा रंग उजळावा आणि त्यावरील डाग कमी व्हावेत म्हणून अर्ध्या पपईचा रस काढावा त्यात गॉझ् भिजवावे व ते चेहऱ्यावर पसरावे. त्यावर पपईचा गर लेपावा, वाळू द्यावे. मग हे जिन्नस काढून चेहरा धुवावा. चेहऱ्यास मसाज केल्यावर पिकलेल्या पपईचा गर फ्रुट पॅकप्रमाणे लेपावा. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे त्वचा आकसली जाऊन कांती सुधारते. म्हणूनच जर हे नियमितपणे चेहऱ्यास लावले, तर त्यावरील डाग, राप निघून येण्यास मदत होते.