निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका रुग्णालये व दवाखान्यातील 21 डॉक्टरांच्या बदल्या महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिका-यांसह विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. गोविंद तळपाडे यांची प्राधिकरणातून पिंपरीगाव दवाखान्यात, डॉ. वर्षा डांगे यांची कुटुंब नियोजन विभागातून वायसीएम रुग्णालयात, डॉ. विकल्प भोई यांची आकुर्डी रुग्णालयातून बोपखेल दवाखान्यात, डॉ. सुनीता साळवे यांची यमुनानगर रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. गितांजली कोल्हे यांची यमुनानगर रुग्णालयातून वाल्हेकरवाडी दवाखान्यात, डॉ. सध्या भोईर यांची वाल्हेकरवाडी दवाखान्यातून म्हेत्रेवस्तीच्या दवाखान्यात बदली केली आहे.
डॉ. स्मिता नागरगोजे यांची नेहरुनगर दवाखान्यातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. रामनाथ बच्छाव यांची भोसरी रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. किशोरी नलवडे यांची थेरगाव रुग्णालयातून तालेरा रुग्णालयात, डॉ. आसावरी ढवळे यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालयात, डॉ. छाया शिंदे यांची यमुनानगर रुग्णालयातून नेहरुनगर दवाखान्यात, डॉ. राजीव शहारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून यमुनानगर रुग्णालयात, डॉ. अंजली ढोणे यांची तालेरा रुग्णालयातून पुनावळे येथील दवाखान्यात बदली झाली आहे.
डॉ. श्रीराम भंडारे यांची पोस्ट मार्टेम विभागातून सांगवी रुग्णालयात, डॉ. संजय पोटे यांची पिंपरीगावातील दवाखान्यातून प्राधिकरणातील दवाखान्यात, डॉ. राहुल साळुंखे यांची पोस्ट मार्टेम विभागातून आकुर्डी रुग्णालयात, डॉ. तृप्ती सांगळे यांची वायसीएम मधून वैद्यकीय मुख्य विभागात, डॉ. मेधा खरात यांची वायसीएममधून भोसरी रुग्णालयात, डॉ. प्रकाश ताडे यांची भोसरी रुग्णालयातून सांगवी रुग्णालयात तर, डॉ. स्नेहा जगदाळे यांची सांगवी रुग्णालयातून भाटनगर येथील दवाखान्यात बदली करण्यात आली.