जावली – मेढा | प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
जावली तालुका हा दुर्गम डोंगराळ असून शासनाच्या योजना राबवित असताना अडचणी येत असल्या तरी आम्ही सामान्य जनतेच्या दारापर्यत जावून लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून जावलीचा सातबारा लवकरच ऑनलाईन करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
मेढा येथिल शासकीय विश्राम गृहावर पत्रकारांशी वार्तालाप करीत असताना बोलत होत्या. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, तहसिलदार रोहीनी आखाडे, पत्रकार संजय दळवी, सुरेश पार्टे, शशिकांत गुरव, विजय सपकाळ, नंदु गाडगीळ, भास्कर धनावडे, सोमनाथ साखरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्राधान्य देऊन सोडवु असे आश्वासन देवुन शासकिय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरीत भरू असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यावेळी म्हणाल्या स्त्रीयांचे आरोग्य सुधारणे गरजेचे असून त्यांच्यासाठी प्रत्येक .आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल कारण सध्या शासकीय रुग्नालयाकडे महिला जात नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टर व्यवसायाच्या दृष्टीने पाहत असून १५ टक्के सिझर करण्याची आवश्यकता असताना ३० टक्के पेक्षा जादा सिझर होत आहेत. त्याचा त्रास महिलांना होत आहे. त्यामुळे शासकिय रूग्नालयात स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध करून त्यास फी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशाही सिघल यांनी सांगितले.
यावेळी झिरो पेन्डशी मुळे तालुक्यात कामे शिल्लक राहणार नाहीत. कामाचा निपटारा तात्काळ करण्यात येईल असेही म्हणाल्या. तसेच ज्या लोकांची कामे होणार नाहीत त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. तसेच पर्याटनाने रोजगार निर्मीती होणार असल्याने जर कोणाला रोजगार निर्मीती संदर्भात जमिनीच्या काही अडचणी येत असतील तर शासकिय कार्यालयाशी संपर्क साधावा असेही सुचित केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनेक प्रश्ना संदर्भात चर्चा केली.