निर्भीडसत्ता न्यूज –
चिखली येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्यातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारले जाणार आहे. या संतपीठाचा विकास आराखडा व त्यातील आवश्यक सोयी-सुविधा, संत साहित्य, वाडःमयाची रचना आदी माहिती मिळविण्यासाठी महापालिका पदाधिकारी, समिती सदस्य, अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा पुर्ण केला आहे. मात्र, त्या दौऱ्याचा अहवाल अद्याप प्रशासनाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर न केल्याने संतपीठाचा आराखड्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव-चिखली या ठिकाणी उभारण्याचा संकल्प केला आहे. या संतपीठ उभारणीला १३ मे २०१५ रोजी महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक १६५३ मधील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठात सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश देवून त्या संतपीठात मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. या संतपीठाचा अभ्यासक्रम काय असावा हे ठरविण्यासाठी समितीही नेमली आहे.
संतपीठाच्या इमारतीचे स्ट्रक्चर, त्यातील अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासाची रचना, संतपीठात राहणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था, वर्ग खोल्यांची रचना, संत साहित्याची माहिती, अध्यात्मिक शिक्षण, ते उपलब्ध असणारी ठिकाणी, सर्व संतांचे वाडःमय एकत्रित मिळण्याची ठिकाणी, या संतपीठातून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचे भवितव्य आदी बाबींचा अभ्यास करण्यात येणार होता.
दरम्यान, संतपीठाला पालिकेने मान्यता देवून अडीच वर्षे लोटली आहेत. संतपीठाचा “डीपीआर’ बनविण्यास विलंब होवू लागला आहे. अगोदर अभ्यास दौरा वेळेवर झाला नव्हता. आता अभ्यास दौरा होवूनही अहवाल नसल्याने “डीपीआर’ लांबणीवर पडला आहे. त्यामुळे अभ्यास अहवाल मिळून त्यांचा आराखडा पूर्ण झाल्याशिवाय संतपीठाच्या कामाला गती मिळणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
————————————————————————–
दौऱ्याला आमदार लांडगे, संत साहित्यांचे अभ्यासक सदानंद मोरे, आयुक्त हर्डीकर यांनी मारली दांडी
राज्यातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारले जाणार आहे. या संतपीठाचा आराखडा व त्यातील आवश्यक सोयी-सुविधा, संत साहित्य, वाडःमयाची रचना आदी माहिती मिळविण्यासाठी महापालिका पदाधिकारी, समिती सदस्य, अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा पुर्ण केला आहे. यामध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हभप दिनकर शास्त्री, नगरसेवक दत्ता साने, नगरसेविका साधना मळेकर, शिक्षणाधिकारी बी.एस.आवारी आदींनी आठ दिवसाचा दौरा पुर्ण केला. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, संत साहित्यांचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी दौऱ्याला दांडी मारली होती.
—————————————————————————-
संतपीठाचा आराखडा बनविण्यासाठी देशभर अभ्यास दौरा

महापालिकेने संतपीठाचा आराखडा बनविण्यासाठी देशभर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व अभ्यासक हरिद्वारचे पतंजली संस्कृत गुरुकुलम, गुरुकुलम कांगडी नोएडा (दिल्ली), महेश योगी गुरुकुल नांगलोई, सुधांशू गुरुकूल, साध्वी ऋतंभरा वृंदावन, संविध गुरुकुल, आग्रा रोड यमुना महामार्गावरील मायावती गुरुकुल, ओडिशाचे श्री श्री युनिव्हर्सिटी, कटकचे गोदी साही आदी विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत.