निर्भीडसत्ता न्यूज –
पद्मावती चित्रपटाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील राजपूत समाजाने पिंपरीत आंदोलन केले. या दरम्यान आंदोलकांना पालकमंत्री गिरीश बापट यांची पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्याबाबत संबधितांना सूचना दिल्याचे त्यांनी म्हटले.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात राणी पद्मिनीचा अपमान केल्या असल्याचा आरोप रजपूत समाज संघटनेने केला आहे. त्यांनी सोमवारी (दि. २७) पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढून पालकमंत्री बापट यांना निवेदन दिले. त्यावेळी बापट यांनी निवेदन स्विकारून नागरिकांना मान्य नसलेले चित्रीकरण रद्द करून सिनेमा दाखवा, असे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले. तसेच, कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पद्मावती चित्रपट प्रदर्शित करु नका, अशा सूचना संबधितांना दिल्या असल्याचेही ते म्हणाले.